Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ना. मुश्रीफांच्या खुलाशाने संभ्रमावर पडदा
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:26 AM (IST)
Tags: main news
वाई येथे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता शिबिराकडे दोन्ही भावांची पाठ, असे वृत्त राज्य पातळीवरील काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने शिबिर परिसरात मोठी चर्चा सुरु होती. त्यातच आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व्यासपीठावर उशिरा आगमन झाले. त्यामुळे ना. हसन मुश्रीफ यांनी अधिवेशनाकडे "दोघा भावांची पाठ' अशी हेर्डिंग्ज काढू नका, असे जाहीरपणे सांगितले. अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन कॅ. दिनकरराव सावंत यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे गेल्याने ते उशिरा आले आहेत. महिला आरक्षण आणि बजेटच्या चर्चेसाठी दिल्लीत अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा व्हिप पक्षाने काढल्याने खा. श्री. छ. उदयनराजे शिबिराला आलेले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. मात्र वृत्तवाहिन्यांच्या खोडसाळपणामुळे चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो, अशा भावना व्यक्त करत खा. श्री. छ. उदयनराजे आणि आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: