Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

अर्जेंटिनाकडून पराभव पत्करणारा भारत आठवा
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:45 AM (IST)
Tags: sports

नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : भारताच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील मोहिमेची सांगताही पराभवानेच झाली. सातव्या व आठव्या स्थानासाठी शुक्रवारी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर झालेल्या प्ले ऑफ लढतीत अर्जेंटिनाने भारताला 4-2 असे हरवले. त्यामुळे भारताला 8 वे स्थान मिळाले. अर्थात गतस्पर्धेत 11 व्या स्थानी फेकल्या गेलेल्या भारतीय संघाची ही कामगिरी समाधानकारकच म्हणावी लागेल. नवव्या व दहाव्या स्थानासाठी झालेल्या प्ले ऑफ लढतीत न्यूझीलंडने सडनडेथमध्ये गोल नोंदवून दक्षिण आफ्रिकेला 9-8 असे नमवले.
जर्मनीत चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 9 ते 12 क्रमांकांसाठी झालेल्या लढतीत अर्जेंटिनानेच भारताला 3-2 असे नमवले होते. त्या पराभवाची पुनरावृत्ती भारताने यावेळीही केली. अर्जेंटिनाकडून मार्टिन ल्युकास व्हिला (43 व 45 वे मिनिट) याने दोन गोल केले. त्याशिवाय टॉमस इनोसंट अर्जेंटो (28 वे) व फाकुंडो कॅलिओनी (46 वे) यांनी गोल केले. भारताकडून संदीपसिंग (42 वे) व शिवेंद्रसिंग (49वे) यांनी गोल नोंदवले. भारताने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. मात्र अर्जेंटिनाच्या डीमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर भारतीय हॉकीपटू नेहमीप्रमाणे नेमबाजीत कमी पडले. भारताने पूर्वार्धात बहुतांश वेळेत नियंत्रण राखले. चेंडूवर जास्त वेळ ताबा ठेवण्यातही त्यांना यश आले होते. मात्र दीर्घ पल्ल्याच्या पासेसवर गोल नोंदवण्यात आघाडीपटू कमी पडले.
त्याउलट अर्जेंटिनाला भारतीय गोलक्षेत्रात घुसखोरी करण्याची संधी कमी वेळा मिळाली. मात्र मिळालेल्या संधींचे सोने करत त्यांनी धडाधड गोल लगावले. बहुतेक वेळा त्यांनी भारताच्या आक्रमणाला प्रतिआक्रमणाने उत्तर दिले. पूर्वार्धात भारताने दबाव ठेवून दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण ड्रॅगफ्लिकर संदीपसिंगला अर्जेंटिनाच्या गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. अनुभवी प्रभजोतसिंग पुन्हा एकदा प्रभावहीन ठरला. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या चाहत्यांशी प्रभजोतने हुज्जत घातली. एकदा तर त्याने वैफल्यग्रस्ततेतून हॉकीप्रेमींच्या दिशेने अश्लील हावभाव केले.
गुरविंदरसिंग चंडीला 17 व्या मिनिटाला चांगली संधी चालून आली होती. मात्र अर्जुन हलाप्पाच्या पासवर त्याने मारलेला फटका गोलपोस्टच्या थोडा बाहेरुन गेला. त्यामुळे आघाडी घेण्याची भारताची संधी हुकली. अखेर अर्जेंटिनाने 28 व्या मिनिटाला गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडून आघाडी घेतली. संदीपसिंगने उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे भारताने बरोबरी साधली. पण नंतर अर्जेंटिनाने दोन गोल लगावून पुन्हा आघाडी
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: