Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वीज जोडणी मिळताच वाखरीची नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 10:49 PM (IST)
फलटण, दि. 13 : वाखरी, ता. फलटण येथील भारत निर्माण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून वीज जोडणीअभावी ही योजना सुरु करण्यात विलंब झाला. तथापि आता वीज जोडणी मिळताच सदरची योजना सुरु होत असल्याचे सरपंच ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.  भारत निर्माण योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आलेली ही योजना ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील बनकर,  निंबाळकरवस्ती, गायकवाडवस्ती, सुतारवस्ती, इंदलकरवस्ती आदी वस्त्यांसाठी असून लवकरच या योजनेतून या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, गावासाठीची प्रचलित योजना व्यवस्थित सुरु असल्याचे जाधव यांनी सांगितले.
ढवळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून होणारा पाणी पुरवठा खर्चिक असल्याने त्याऐवजी जुन्या नळ पाणी पुरवठा योजनेतून गावाला पाणी पुरवठा केला जात असून त्यातून योग्य दाबाने व पुरेसा पाणी पुरवठा होत आहे. तथापि वीज भारनियमनामुळे पाणी पुरवठा रात्री उशिरा होत असे, मात्र आता सिंगल फेजिंग योजना कार्यान्वित झाल्याने वीज भारनियमनाचे तास कमी झाले असून  पाणी पुरवठा योजना व्यवस्थित सुरु होवून गावाला पुरेसा व योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत निश्चित पार पाडेल, अशी ग्वाही जाधव व ग्रामसेवक भोसले यांनी दिली.
दरम्यान, नानासाहेब ढेकळे, पप्पू ढेकळे वगैरेंनी गावात पुरेसा व वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने सुगीच्या दिवसात दिवसभर कंटाळलेल्या ग्रामस्थांना रात्री-अपरात्री येणाऱ्या पाण्यासाठी जागे रहावे लागत असल्याचे एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले असून ग्रामपंचायतीने गावातील जुनी, मोडकळीस आलेली पाण्याची टाकी पाडून टाकल्याने पाणी साठवणीची सुविधा नसल्याचे या दोघांनी निदर्शनास आणून दिले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: