Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आझादपूरनजिक अपघातात अनिल घोरपडे ठार
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:25 AM (IST)
Tags: regional
कोरेगाव, दि. 11 : कोरेगाव-भाडळे रस्त्यावर आझादपूरनजिक बुधवारी सायंकाळी टाटा 407 टेम्पो व दुचाकीच्या अपघातात स्नेहा शुगर्सच्या लेखा शाखेतील कर्मचारी अनिल पंढरीनाथ घोरपडे, वय 43, रा. हासेवाडी  व शिवाजी अहिरेकर, रा. विखळे हे दोघे जखमी झाले. सातारा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना घोरपडे यांचे निधन झाले.
अनिल घोरपडे व शिवाजी अहिरेकर हे दोघे स्नेहा शुगर्सच्या लेखा शाखेत काम करत आहेत. कारखान्यातील शिफ्ट सुटल्यानंतर अनिल घोरपडे यांची बजाज कावासाकी मोटारसायकल क्र. एम. एच. 09-ई-5452 वरुन घोरपडे व अहिरेकर चिमणगाव-आझादपूर-मार्गे हासेवाडीकडे निघाले होते. आझादपूरहून कांदा भरुन पुसेगावकडे निघालेला टाटा 407 टेम्पो क्र. एम. एच. 11-सी. टी.-3069 ची  दुचाकीला धडक बसली. या अपघातात घोरपडे हे गंभीर जखमी झाले. अहिरेकर यांना किरकोळ दुखापत झाली. दोघांना सातारच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना अनिल घोरपडे यांची गुरुवारी सकाळी प्राणज्योत मालवली. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: