टॅक्सी-ऍटोरिक्षा परवान्याचे नूतनीकरण
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:45 AM (IST)
सातारा, दि. 11 : ऍटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या नूतनीकरणास विलंब झाला आहे, अशा परवानाधारकांनी वाहनांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन दि. 31 मार्चपर्यंत सादर करणे आवश्यक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. डी. आटोळे यांनी दिली. नूतनीकरणाची प्रकरणे प्रादेशिक परिवहन प्राधिकारी, कोल्हापूर यांच्यासमोर सादर करावयाची असल्याने तसेच परवान्याची रिप्लेसमेंटची सहा महिने मुदत दिलेली संपली आहे. परंतु परवाना नूतनीकरणाची मुदत आहे, अशा रिप्लेसमेंटधारकाने आपली रिप्लेसमेंट व मुदतीत वाहन का घेवू शकले नाही, त्याची माहिती कागदावर लिहून रिप्लेसमेंटसह दि. 31 मार्चच्या आत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे देण्यात यावीत. दिलेल्या तारखेनंतर कुठल्याही प्रकारचा विलंब झाल्यास परवाने स्वीकारले जाणार नाहीत, असे आटोळे यांनी सांगितले.