Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मेक्सिकोचे कार्लोस सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी चौथे, लक्ष्मी मित्तल पाचवे
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 12:21 AM (IST)
Tags: national
न्यूयॉर्क, दि. 11 (वृत्तसंस्था) : फोर्बेस प्रकाशन संस्थेने यंदाच्या जगातील पहिल्या दहा अब्जधिशांची यादी घोषित केली आहे. ती पुढीलप्रमाणे.
1) कार्लोस स्लिम हेलू : एकूण संपत्ती 53.5 अब्ज डॉलर, उद्योग- टेलिकॉम, मेक्सिको. गेल्यावर्षी तिसऱ्या क्रमांकावरून बिल गेटस यांच्यावर मात करत पहिल्या क्रमांकावर झेप. गेल्या वर्षापेक्षा उलाढालीत 18.5 अब्ज डॉलरची वाढ.
2) बिल गेटस : एकूण संपत्ती 53 अब्ज डॉलर. उद्योग - मायक्रोसॉफ्ट, अमेरिका, मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अन्य ठिकाणी 60 टक्के गुंतवणूक. 2008 पासून दैनंदिन कामकाजापासून अंग काढून मानव कल्याणाचा वसा.
3) वॉरन बफे : एकूण संपत्ती 47 अब्ज डॉलर. उद्योग- गुंतवणूक, अमेरिका, अमेरिकेतील प्रसिध्द गुंतवणूकदार. गेल्या वर्षापेक्षा 10 अब्ज डॉलर व्यवसायवृध्दी. अलीकडेच बर्लिंग्टन नॉर्दर्न सांता फे रेल्वेमार्ग 26 अब्ज डॉलरला खरेदी.
4) मुकेश अंबानी : एकूण संपत्ती 29 अब्ज डॉलर. भारतातील सर्वाधिक श्रीमंत. उद्योग- पेट्रोकेमिकल्स,ऑईल अँड ग्रॅस. भारत, रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील मूल्यवान कंपनी, अलीकडेच कॅनडातील तेल कंपनीतील हिश्श्यासाठी  2 अब्ज  डॉलरची बोली मंजूर झाल्यास 65 टक्के मालकी. अन्य कंपन्या ताब्यात घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरपासून 2 अब्ज डॉलरला खरेदची मागणी. मात्र ती फेटाळली.
5) लक्ष्मी मित्तल : एकूण संपत्ती 27.7 अब्ज डॉलर. उद्योग- पोलाद, भारत, लंडनमधील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाचे गृहस्थ. जगातील सर्वात मोठे पोलाद उत्पादक, स्वत:च्या वेतनात 12 टक्के कपात. शेअर बाजारात शेअरच्या भावात एक तृतियांश वाढ. भारतातील ओरिसा व झारखंडमध्ये प्रकल्प सुरू करण्याची इच्छा. सरकारची अद्याप मान्यता नाही.
आता पुढील क्रमांक 6 ते 10 अब्जाधिशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
6) लॉरेन्स एलिसन : एकूण संपत्ती 28 अब्ज डॉलर.
7) बर्नार्ड अर्नोल : एकूण संपत्ती 27. 5 अब्ज डॉलर.
8) आईक बाटिस्टा : एकूण संपत्ती 27 अब्ज डॉलर.
9) अनान्सिओ ओर्टेगा : एकूण संपत्ती 25 अब्ज डॉलर.
10) कार्ल अल्ब्रेख्ट : एकूण संपत्ती 23.5 अब्ज डॉलर.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: