रकिबुल हसनची अकस्मात निवृत्ती
pti news
Friday, March 12, 2010 AT 01:15 AM (IST)
चित्तगाव, दि. 11 (वृत्तसंस्था) : बांगलादेशचा अवघा 22 वर्षे वयाचा क्रिकेटपटू रकिबुल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकस्मात निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडविरुध्द पहिली कसोटी दोन दिवसांवर आली असताना हसनने बुधवारी बांगलादेशला धक्का दिला.
मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या हसनने व्यवस्थापक शफिकुल हक यांच्याकडे दुपारी आपले निवृत्तीचे पत्र सोपवले. त्यानंतर तो चित्तगावमधून विमानाने बाहेर गेला. रकिबुलने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती पत्करल्याच्या वृत्ताला हक यांनी दुजोरा दिला. मात्र या अकस्मात निवृत्तीचे कारण त्याने पत्रात लिहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
रकिबुलची वनडे संघातून हकालपट्टी झाली होती. मात्र इंग्लंडविरुध्द होणाऱ्या कसोटीसाठी त्याची निवड झाली होती.