Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड कलिनरी आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:46 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 11 : येथील सावित्री एज्युकेशनल ट्रस्ट संचलित हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड कलिनरी आर्टस्‌ इन्स्टिट्यूमध्ये नुकतेच डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकतेच विदेशामध्ये गेल्या 14 वर्षांपासून हॉटेल व्यवस्थापन आणि क्रूझ लायनर क्षेत्रात काम करणारे मृत्यूंजय प्रसाद, व्हेन्‌स हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग सर्व्हिसेस कंपनीचे गुजरात विभागाचे संचालक दीपक तांक आणि इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. शैला प्रसाद यांच्या वतीने तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणातंर्गत विद्यार्थ्यांना कॉन्टिनेंटल, ओरिएंटल, बेकरी आणि कॉन्फेक्शनरी, मेन्यू प्लॅनिंग, खाद्य पदार्थांची आकर्षक सजावट (प्लेटिंग) याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड कलिनरी आर्टस्‌ इन्स्टिट्यूट
तसेच व्हेन्‌स हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आले. व्हेन्‌स सर्व्हिसेसच्या वतीने इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट
प्रशिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट कन्स्लटन्सी आणि हॉटेल मॅनेजमेंटसंबंधी विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यात अग्रेसर असून गुजरात, उत्तरांचल आणि महाराष्ट्रात या संस्थेने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याच संस्थेच्या वतीने अल्पावधीतच हॉटेल मॅनेजमेंट संबंधी शॉर्ट
टर्म कोर्सेस सुरू करण्यात
येणार असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी मो. 9423035258 आणि 9925249797 वर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक संजय प्रसाद यांनी केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: