Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा पालिकेच्यावतीने आज शाहू कलामंदिर येथे विशेष कार्यक्रम
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:40 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 11 : सातारा नगरपरिषदेमार्फत महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिला व मुलींसाठी हिंदी-मराठी मिश्र गीतांची मैफल शुक्रवार, दि. 12 रोजी सायंकाळी 6 वाजता शाहू कलामंदिरात रंगणार आहे. निनाद निकेतन प्रस्तुत रसिक मनमोहिनी निर्मित आणि सौ. अंजली सिंगडे-राव यांच्या संगीत संयोजनाने ही मैफल बहरणार असून त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कविता देगावकर यांनी केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: