शेअर बाजाराबाबत आज मोफत कार्यशाळा
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:42 AM (IST)
सातारा, दि. 11 : शेअर बाजारासंबंधी सामान्य गुंतवणूकदारांना फ्युचर्स ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंगची सविस्तर माहिती मिळावी यासाठी मनियोग टेक्निकल सर्व्हिसेस यांच्यावतीने शुक्रवार, दि. 12 मार्च रोजी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स हॉल, स्वारगेट (पुणे) येथे सायंकाळी 5 ते रात्री 9 यावेळेत आणि शनिवार, दि. 13 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 तसेच सायंकाळी 5 ते रात्री 9 यावेळी शिक्षक भवन हॉल, नवी पेठ, गांजवे चौक (पुणे) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत मनियोग टेक्निकल सर्व्हिसेसचे टेक्निकल ऍनालिस्ट योगेश लाटणेकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस येणारांना मोफत 15 दिवसांचे मार्गदर्शन मिळणार असून त्यासाठी कार्यक्रमस्थळी अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मनियोग टेक्निकल येथे अथवा मोबाईल क्रमांक 9422652464 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.