Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांना चांगली संधी : श्रीमंत सौ. शिवांजलीराजे
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:41 AM (IST)
Tags: regional
फलटण, दि. 11 : महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीमुळे स्त्रियांना मोठे व्यापक क्षेत्र आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी उपलब्ध झाल्याचे सांगून स्त्रियांना मोठी संधी यामुळे प्राप्त झाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. 
चूल आणि मूल एवढ्या मर्यादित अपेक्षेने स्त्रियांकडे पाहिले जात होते. तथापि या विधेयकामुळे आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांची मर्यादित संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असून विविध क्षेत्राप्रमाणेच स्त्रिया राजकीय प्रक्रियेत किंबहुना सत्तेच्या राजकारणात पुरुषांच्या बरोबरीने योग्य निर्णय घेवून उत्तम काम करतील, असा विश्वास श्रीमंत सौ. शिवांजलीराजे यांनी व्यक्त केला आहे. या विधेयकामुळे स्त्रियांना विश्वव्यापक क्षेत्र प्राप्त झाले असून आपले कर्तृत्व दाखविण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. त्याचा फायदा घेवून स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिध्द करावे, असे आवाहन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: