शास्त्र महाविद्यालयात सावरकरांना आदरांजली
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:22 AM (IST)
कराड, दि. 10 : येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महा-विद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. प्राचार्य डॉ. एम. बी. गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपप्राचार्य डी. के. सरगर, पर्यवेक्षक आर. ए. सायमोते, प्रा. एस. जी. पाठक, डॉ. एस. आर. चव्हाण, डॉ. एस. बी. केंगार, डॉ. गोयल, डॉ. एस. एच. जगदाळे, डॉ. बजेकल, प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, प्रा. टी. बी. सावंत, प्रा. जगताप, प्रा. माने, प्रा. रेळेकर, प्रा. सौ. सरवदे, कु. पाटील, सौ. मोटघरे, प्रशासकीय सेवक एम. व्ही. शेटे, श्रीमती थोरवडे, कदम, तुपे यांच्यासह विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.