आध्यात्मिक शिक्षण
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 10:57 PM (IST)
अमेरिकेतील कॉलेजची स्थिती कशी आहे पाहा. बी. ए. एम. ए. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, इत्यादी डिग्रीपर्यंत इतर अभ्यासाबरोबर शारीरिक शिक्षण दिले जाते. उत्तम शिक्षणाबरोबर शेतकी, लोहार, सुतार, आणि गवंडी यांचे काम देखील शिकविले जाते. मनुष्यामध्ये मुख्य तीन भाग आहेत. कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि तिसरे अंत:करण. यांना इंग्रजीमध्ये हॅन्ड, हेड आणि हार्ट असे म्हणतात. ज्ञानेंद्रियांच्या योगाने बाहेरील ज्ञान आत जाते आणि बाह्य वस्तूंचा मनावर परिणाम होतो. हात, पाय इत्यादी कर्मेद्रियांनी अंत:शक्तीचा बाह्य वस्तूंवर परिणाम होतो. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांची योग्य वाढ व उन्नती झाली तरच चांगले. परंतु जर आपण बाहेरचे ज्ञान आत कोंबत चाललो व आतील ज्ञान व शक्ती बाहेर जाऊ दिली नाही तर मनुष्य खात राहतो. पण त्याचा कोठा मात्र रिकामा होत नाही. यासारखी स्थिती होते व याचा परिणाम बौध्दिक बध्दकोष्ठ आणि आध्यात्मिक अग्निमांद्य हा होतो. हे शिक्षण नव्हे, हा रोग आहे. अमेरिकेतील सर्वसाधारण विश्वविद्यालयाच्या शिक्षणक्रमाचा उद्देश हा आहे, की देशांतील वस्तूंचा उपयोग करता यावा व जमीन, खाणीतील पदार्थ, वनस्पती वगैरे वस्तूंचा योग्य उपयोग करणे आणि त्यांची किंमत वाढविणे याचे ज्ञान व्हावे. जेवढ्या कला शिकविल्या जातात त्या सर्वांचा उद्देश उपयुक्तता हा असतो. रसायनशास्त्र व्यवहारात आणण्याची केमिकल इंजिनियरिंगसारखी कला न शिकता नुसते रसायनशास्त्र कोणी मुलगा व्यर्थ शिकणार नाही. एका धार्मिक कॉलेजमध्ये "रामा' चे व्याख्यान झाले. व्याख्यानाच्या शेवटी कॉलेजच्या लोकांनी आपली जंगी कवाईत दाखविली आणि जयघोषांनी व्याख्यात्याला सलामी दिली. "रामा' ने विचारले "धार्मिक कॉलेजात जंगी कवाईत! हे काय?' प्रिन्सिपालने उत्तर दिले, की "धर्माचा अर्थ असा आहे की, देह आणि देहभाव यांना येशूप्रमाणे सूळावर चढविले पाहिजे.