Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"राष्ट्रवादी' कार्यकर्ता शिबिराच्या तयारीचावसंत वाणीयांच्याकडूनआढावा
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:12 AM (IST)
Tags: regional
वाई, दि.  10 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या  पार्श्वभूमीवर येथे शुक्रवार, दि. 12 रोजी होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रराष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता शिबिराची जय्यत तयारी सुरू असून प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी त्याचा आढावाघेतला. यावेळी आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत पिसाळ, तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी वाई बाजार समितीच्या यशवंतराव चव्हाण नगरात  होणाऱ्या या शिबिरासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या 5 जिल्ह्यातीलसुमारे 5हजार पदाधिकारी उपस्थितराहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष आ. मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली  व  उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात ना. आर. आर. पाटील, ना. अजित पवार, ना. जयंत पाटील, ना. हसन मुश्रीफ, पालकमंत्री ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष ना. बाबासाहेब कुपेकर, खा. सौ. सुप्रिया सुळे, निवेदिता माने, श्रीनिवास पाटील, आ. सौ. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरासाठी 20हजार फुटांचा भव्य मंडप उभारण्यात येत असून व्यासपीठावर 100 मान्यवर तर मंडपात 5000 पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.   भोजनासाठी 5 हजार चौरसफुटांचा स्वतंत्र मंडप घालण्यात आला आहे. शिबिरासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था बाजार समिती, एमएसईबी मैदान, मिशन हॉस्पिटल, पेट्रोल पंपाशेजारील मैदान, आदित्य ऍटो तसेच खामकर कॉम्प्लेक्स समोरील मैदान या ठिकाणी करण्यात आली आहे. तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेऊन वाणी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे सभापती विजयसिंह नायकवडी,उपसभापतीमहादेव मसकर,सदस्यप्रमोदशिंदे, सत्यजित वीर, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, मनोज पवार, मनीष भंडारे, अनिल सावंत, नितीन मांढरे, जितेंद्र पिसाळ, राष्ट्रवादी तालुका व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: