Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शुध्दीपत्रक
PTI ---
Thursday, March 11, 2010 AT 11:24 PM (IST)
मुंबई, दि. 11 : सहायक संचालक, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, गट-अ च्या विविध सात विभागातील एकूण 11 पदांकरिता
आयोगाने दि. 12 रोजी जाहिरात विभागनिहाय विज्ञापित केलेली
आहे. ही पदे विभागनिहाय विज्ञापित केली असली तरी ही
पदे एकाच संवर्गातील असल्याचे शासनाने स्पष्ट केल्यामुळे
उमेदवारांनी एकापेक्षा जास्त विभागातील पदांसाठी केलेल्या अर्जांच्या अनुषंगाने त्यांचा सर्व विभागातील एकूण 11 पदांसाठी एकत्रित
विचार करण्यात येणार आहे. तसेच या पदाच्या मुलाखतीबाबत उमेदवारांना आयोगाच्या वेबसाईटवर तसेच मुलाखतपत्राद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
या बाबी उमेदवारांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे,
असेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव नि. श. पटवर्धन यांनी कळविले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: