Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हिरवाई निसर्गयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 10:55 PM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 11 ः पर्यावरण जागृतीसाठी शालेय जीवनातच पर्यावरण जतनाचे संस्कार व्हावेत आणि निसर्गाशी जवळीक साधून निसर्गाविषयी उत्कंठा जागी करण्याच्या हेतूने सदरबझार येथे आयोजित केलेल्या हिरवाई निसर्ग यात्रेचे उद्‌घाटन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास शालेय विद्यार्थ्यांसह शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी माणदेशी महिला बॅंकेच्या संस्थापिका चेतना सिन्हा, प्रा.मंजिरी देसाई, नगरसेवक निशांत पाटील, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील, प्राचार्य  डॉ. संजय कांबळे, जयवंत गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
या हिरवाई निसर्गयात्रेमध्ये डॉ. भाकरे कॅक्टस्‌ प्रदर्शन, वणवा विरोधी पोस्टर, वनस्पती व आयुर्वेद माहिती, विषारी-बिनविषारी सापांची माहिती, पक्षी फोटो प्रदर्शन, वन्यजीव संरक्षण पोस्टर, कास पठारावरील विविधता, पृथ्वीच्या पोटातील खजिना, प्रदूषणविरोधी चळवळ तसेच गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूरतर्फे वेगवेगळ्या प्रकारची रत्ने आणि उपरत्ने, खनिज-खनिजांचे प्रकार यामध्ये सोने, ऍल्युमिनियम, लोखंड यांचा समावेश करण्यात आला होता.  त्याचप्रमाणे अभ्रक, ऍस्बेस्टॉस, वेगवेगळ्या प्रकारची जीवाश्मे, विविध नमुन्यांची खनिजे नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिश दगड, विविध देशातील नाण्यांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात आला होता. पृथ्वीच्या पोटातील खनिजांचे प्रकार प्रत्यक्ष बघण्याची संधी येथे उपलब्ध करण्यात आली.  रत्नांच्या 42 नमुन्यांमध्ये माणिक, पाचू, पोवळा, सोने वगैरे रत्नांचा यामध्ये समावेश होता. 
हिरवाई प्रकल्पाच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांनी उपस्थितांना प्रकल्पाविषयी विस्तुत माहिती दिली.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: