जनतेला फार काळ फसवू शकत नाही : ऍड. गुंडगे
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:18 AM (IST)
दहिवडी, दि. 10 : येथील महादेव मंदिरासाठी कोणताही निधी न देता विरोधकांनी विधानसभेपूर्वी राजकीय हव्यासापोटी नारळ फोडून जनतेची दिशाभूल करुन फसवणूक केली. ही फसवणूक फारकाळ टिकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती ऍड. भास्करराव गुंडगे यांनी केले.
येथील महादेव मंदिरास केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सभामंडपाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. सदाशिवराव पोळ, कुंडलिक पोळ, सरपंच जनार्दन काशीद, ग्रामपंचायतीचे सदस्य सुधीर गोंजारी, बापूसाहेब साखरे, डॉ. शामराव जाधव, गायकवाड, विजय साखरे, अमृत जाधव, जयवंत कुबेर, दादासाहेब जाधव, तानाजी जाधव, शेखर माने, गुरुलिंग स्वामी, नंदकुमार कुलकर्णी, शिवाजी शिंदे, मुराद शेख उपस्थित होते.
ऍड. गुंडगे म्हणाले, ना. पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महादेव मंदिराच्या सभामंडपास निधी दिला. मात्र विरोधकांकडून राजकीय हव्यासापोटी कोणताही निधी उपलब्ध न करता या कामाचा नारळ फोडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मात्र ती फारकाळ टिकत नाही. विधानसभेला चुकीचा निर्णय घेतला गेल्यामुळे त्याचा परिणाम आता भोगावा लागत आहे हे लोकांना देखील कळले आहे. यावेळी सदाशिवराव पोळ यांचे भाषण झाले. दहिवडीचे पोलीस पाटील रामचंद्र पोळ यांनी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी 5 हजाराची देणगी दिली. कार्यक्रमास बाळासाहेब कुलकर्णी, सुरेश तुपे, महेश कदम, तेजस पवार, सिध्दार्थ गुंडगे, सुरज गुंडगे, संग्राम गोसावी, सुनील चव्हाण, सिध्दार्थ खरात, तानाजी पवार, महेश इदाते, विश्वनाथ किर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते.