कोल्हापूर जि. प. तसेच मान्याचीवाडी ग्रामपंचायत यांना पुरस्कार जाहीर
PTI ---
Thursday, March 11, 2010 AT 11:35 PM (IST)
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : राज्यात 2006-2009 या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ठ जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या घोषणा आज गुरुवारी ग्राममंत्री जयंत पाटील यांनी केली. ज्या राज्यस्तरीय निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन जिल्हा परिषदा आहेत त्यात कोल्हापूर, रायगड, जळगाव यांचा समावेश आहे.
पंचायत समितीमध्ये कडेगाव,जि. सांगलीचा समावेश आहे. निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत पुणे विभागातून मान्याचीवाडी, ता. पाटणचा समावेश आहे.