निर्मलगावांचा जाहीर सत्कार
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:12 AM (IST)
सातारा, दि. 10 ः श्री संत गाडगे महाराज संस्थेच्यावतीने गाडगे महाराज जयंती सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात जिल्ह्यातील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात निवड झालेल्या निर्मल-गावांचा सत्कार ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, मदन भोसले, सुधाकर गणगणे, शंकरराव जगताप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता वेद्भवन मंगल कार्यालय, संगमनगर येथे हा सत्कार समारंभ होणार आहे. या सत्कार समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन सर्जेराव जांभळे, रामचंद्र राऊत, राजेंद्र सोनटक्के, लक्ष्मण यादव यांनी केले आहे.