बोकील लॅबोरेटरीचे समर्थ मंदिर कलेक्शन सेंटर आजपासून सुरू
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:14 AM (IST)
सातारा, दि. 10 : येथील प्रसिध्द बोकील पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे समर्थ मंदिर येथील कलेक्शन सेंटर उद्या, दि. 11 मार्चपासून सुरू होत आहे.
बोकील लॅबोरेटरी ही आयएसओ मानांकन असलेली सातारा शहरातील एकमेव लॅब आहे. गेली 17 वर्षे या लॅबोरेटरीमधून सातारा शहर व तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत आहे. लॅबमध्ये अद्ययावत मशिनरी असल्याने वैद्यकीय अहवाल (रिपोर्टस्) योग्य वेळेत आणि अचूक मिळतात त्यामुळे या लॅबचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. आता सातारा शहरातील समर्थ मंदिर, बोगदा तसेच यवतेश्वर, कास, बामणोली, ठोसेघर, परळी खोऱ्यातील परळी, अंबवडे, नित्रळ, पाटेघर अशा अनेक गावांमधील रुग्णांच्या सोयीसाठी समर्थ मंदिर येथे कलेक्शन सेंटरची सुविधा बोकील लॅबोरेटरीने उपलब्ध करुन दिली आहे. या सेंटरमुळे या भागातील रुग्णांना अचूक रिपोर्टस् मिळण्याची सोय होणार आहे. परळी भागातून येणाऱ्या रुग्णांची पायपीट, खर्च व वेळ वाचणार आहे. या सेंटरची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 अशी राहील.