Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंचमतर्फे दि. 24 एप्रिल रोजी "एक जरा हटके' कार्यक्रम
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:10 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 9 ः  पंचम ग्रुपच्या चौथ्या वर्षातील शुभारंभानिमित्त "एक जरा हटके' कार्यक्रमाचे शनिवार दि. 24 एप्रिल रोजी शाहू कला मंदिर येथे आयोजन केले आहे.
सातारच्या सांस्कृतिक क्षेत्रात रसिकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या पंचम ग्रुप संस्थेने आपली तीन वर्षांची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या संस्थेने आजपर्यंत शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील दर्जेदार कलाकारांना आमंत्रित करून सातारकरांसमोर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत जयपूर-अत्रोली, किराणा, पतियाला, बनारस, ग्वाल्हेर अशा विविध घराण्यांच्या गायक कलाकारांना आमंत्रित केले होते. तसेच प्रत्येकवर्षी नवनवीन वाद्यवादनाचा आस्वाद रसिकांना घेता आला होता. यामध्ये संतूर, पखवाज, तबला, बासरी, सतार, व्हायोलीन इ. वाद्यांचा भरपूर आनंद रसिकांनी लुटला आहे. अशाप्रकारे पंचम ग्रुपने आपल्या कार्यक्रमांमध्ये विविधता जपली आहे.
जगप्रसिद्ध मोहनवीणा वादक पं. विश्वमोहन भट यांचे ज्येष्ठ शिष्य पं. दीपक क्षीरसागर (बडोदा) आणि पं. मनिषा साठे यांची कन्या सौ. शांभवी वझे (पुणे) यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. सत्यजीत तळवलकर यांची त्यांना तबलासाथ लाभणार आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: