दोन कोटी रुपयांच्या अन्नधान्याची नासाडी
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:01 PM (IST)
नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे गोरगरिबांना अन्नधान्य मिळणे अवघड झालेले असतानाच, गेल्या दहा महिन्यात सरकारी गोदामातील हजारो मेट्रिक टन धान्याची नासाडी झाली आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातल्या सरकारी गोदामातले 2 कोटी रुपये किंमतीचे 4 हजार मेट्रिक टन धान्य खराब झाले. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पावणे दोन लाख रुपये सरकारने खर्च केले आहेत.