क्लार्कच्या नेतृत्वाबद्दल ग्रेग चॅपेलना शंका
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:32 PM (IST)
सिडनी, दि. 10 (वृत्तसंस्था) : नवनवे वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिध्द असलेली आपली प्रेमिका लारा बिंगलसाठी न्यूझीलंड दौरा अर्धवट टाकून परतलेला मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा भावी कसोटी कर्णधार होण्यास पात्र आहे का, असा प्रश्न ग्रेग चॅपेल यांनी विचारला आहे.
आपल्या घराबाहेर नग्न छायाचित्रे देणाऱ्या बिंगलवरुन ऑस्ट्रेलियात वादळ उठले आहे. तिला आधार देण्यासाठी क्लार्क न्यूझीलंडविरुध्दचा दुसरा वनडे सामना संपल्यानंतर लगेच मायदेशी परतला. कसोटी मालिकेसाठी तो पुन्हा संघात दाखल होणार आहे. बिंगलची बाजू घेण्यासाठी दौऱ्यातून परतलेल्या क्लार्कची क्षमता व स्थैर्य शंकास्पद आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून तुम्ही सतत संघाबरोबर राहणे आवश्यक असते. मात्र क्लार्ककडे तो गुण दिसत नाही, असे ते म्हणाले.