Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

एकाक्ष काळवीट
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 09:58 PM (IST)
Tags: bodh katha

एका मोठ्या सरोवराकाठी एक काळवीट राहत असे. दुसऱ्या एका काळवीटाबरोबर झुंजत असता त्याच्या उजव्या डोळ्यास शिंग लागल्याने तो निकामी झाले होते. त्याला फक्त डाव्या डोळ्यानेच दिसे. त्यामुळे तो डोळा सरोवराकडे ठेवून डाव्या डोळ्याने आसपास लक्ष ठेवून ते सरोवराकाठी चरायचे. त्याच्या कल्पनेप्रमाणे सरोवराच्या बाजूने त्याच्यावर कोणी हल्ला करणार नव्हते. त्या डौलदार काळवीटाला पकडण्यासाठी एक शिकारी बरेच दिवस प्रयत्न करीत होता. पण काळवीट मोठ्या हुशारीने त्याच्या तावडीतून निसटले होते. म्हणून त्या शिकाऱ्याने त्याला पकडता आले नाही तर निदान त्याची शिकार तरी करावी या उद्देशाने सरोवरात होडी सोडली आणि नेहमी डावी बाजू सरोवराकडे ठेवणाऱ्या त्या एकाक्ष काळवीटास सहज गोळी घातली.
तात्पर्य : ज्यांच्यावर आपण निर्धास्तपणे विश्वास ठेवतो तेच कधी कधी दगा देतात.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: