Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

अयोग्य भेदभाव
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 12:55 AM (IST)
Tags: vachanamrut
एक हिंदुस्थानी तरुण जपानमध्ये शिकत असता त्याने तेथील लायब्ररीतून एक यंत्रशास्त्राचा ग्रंथ मागून आणला. त्यातील मजकूर अथवा सारांश त्याने उतरून काढला. परंतु त्यातील यंत्रांच्या चित्रांची नक्कल त्याला काढता येईना. या पुस्तकाचा इतरांना देखील फायदा घ्यावयाचा आहे, याचा त्याने विचार देखील न करता चटदिशी त्याने पुस्तकातून ती चित्रांची पाने फाडून घेतली व पुस्तक परत केले. त्याने असा विचार केला नाही की, या आपल्या कृत्याने आपल्या साऱ्या देशाचे नाव बदनाम होईल. ते पुस्तक मोठे होते, त्यामुळे त्याची लबाडी एकदम बाहेर पडली नाही. परंतु ती लपणार कशी? खरे कधी लपून राहिले आहे? एके दिवशी त्याच्या खोलीमध्ये एक जपानी विद्यार्थी आला व टेबलावर असलेली ती फाडलेली पाने पाहून त्याने ती गोष्ट तेथील व्यवस्थापकांना कळविली आणि तेव्हापासून तेथे असा नियम करण्यात आला की,  "यापुढे कोणत्याही हिंदी विद्यार्थ्याला कोणतेही पुस्तक दिले जाऊ नये! विनाशकाले विपरित बुध्दी' ती हीच. जहाजावर हिंदी लोकांना खाण्याचे पदार्थ आणून देणाऱ्या जपानी तरुणाची गोष्ट आपण ऐकलीच आहे आणि या हिंदुस्थानी तरुणाची गोष्ट आपण ऐकत आहा. जपानी तरुण आपल्या देशावर ठपका येऊ नये म्हणून आपले सर्व काही देण्यात तयार आहे आणि हिंदी तरूण आपल्या साऱ्या देशाचे नाव बदनाम झाले तरी हरकत नाही, आपलेच हित पाहातो! असे  म्हणता यावयाचे नाही की, मी एकटा निराळा आहे. माझे रक्त निराळे आणि साऱ्या शरीराचे रक्त निराळे. या अयोग्य भेदभावाने याला जर वाटू लागेल की, मी मिळवितो आणि खातो सारा देश! आणि या अप्पलपोटेपणाप्रमाणे वागावयाचे असल्यास हाताला एकच मार्ग शक्य आहे. तो हा की, आपण जी भाकरी मिळविली असेल ती साऱ्या देहाकरिता तोंडात घालण्याऐवजी हाताने ती आपल्या तळहातावर बांधावी, किंवा आपल्या नखात कोंबावी, पण ही अप्पलपोटेपणाची नीती फायदेशीर होईल काय? हो, आणखी एक मार्ग आहे खरा!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: