Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
साधू यादव कॉंग्रेसमधून निलंबित
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 10:00 PM (IST)
Tags: national
पाटणा, दि. 10 (वृत्तसंस्था) : महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षाच्या धोरणाविरोधी भूमिका घेतल्याबद्दल माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद उर्फ साधू यादव यांना कॉंग्रेसने बुधवारी निलंबित केले.
लालूप्रसाद यादवांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मेहुणे असलेल्या साधू यादवांनी 2009 मधल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लालू विरोधी बंड करून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. पण, ते पराभूत झाले होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: