Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

शुध्द आणि पवित्र मन
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 09:57 PM (IST)
Tags: vachanamrut
अमेरिकेमध्येराष्ट्रैक्यापुढे धर्मभेदांची विशेष मातब्बरी नाही. हिंदुस्थानातील आर्यसमाजी, शीख, मुसलमान, ख्रिस्ती या सर्वांना अमेरिकेत हिंदूच म्हणतात. त्यांच्या अंत:करणात एक राष्ट्रीयत्व इतके बाणले आहे की, आपल्या इकडील धर्मभेदांहून अधिक मोठ्या धर्मभेदांकडे दुर्लक्ष करण्यास त्यांना काही कठीण जात नाही. हिंदुस्थानातील काही जातींना जर हे कळेल की, सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये आपल्याला हिंदूच म्हणतात, तर "हिंदू' या शब्दावर इतकी रणे माजली नसती, आणि "हिंदू' या नावाची त्यांना लाजही पण वाटली नसती.
अमेरिका बलाढ्य होण्याचे एक कारण असे आहे की, तेथे ब्रह्मचर्य आहे, तेथे शारीरिक शक्ती कमी होऊ देत नाहीत. साधारणपणे वीस वर्षांपर्यंत लग्न म्हणजे  काय चीज आहे, ही कल्पना देखील मुला-मुलींच्या मनात येत नाही. सूक्ष्म विचाराअंती याचे एक कारण असे दिसून आले आहे की, तेथे मुलगे आणि मुली लहानपणापासून एकाच ठिकाणी खेळतात, बागडतात, एकाच घरात लिहितात, वाचतात आणि एकत्र राहतात फिरतात. व पुढे देखील एकाच कॉलेजमध्ये बहीण-भावाचे नाते उत्पन्न होते आणि मन शुध्द आणि पवित्र राहते. येथे मुली- मुलांंच्या इतक्याच सशक्त असतात. यामुळे मोठेपणी त्यांची प्रजाही बळकट होते. जर नवरा सशक्त असला आणि बायको मात्र अशक्त असली, तर त्याचा परिणाम असा होतो की, त्यांची संतती शरीरसामर्थ्याने मध्यमच होते. एकदा "राम' जेनेवा सरोवराच्या काठी राहत होता. तेथे एक तेरा वर्षांची मुलगी तीन मैल पोहत गेली. ती कदाचित बुडू लागल्यास मदत असावी म्हणून एक होडी तिच्या मागून मागून चाललीच होती. परंतु मदतीची काही जरूर पडली नाही. मुलीची स्थिती इतकी उत्तम, तर त्यांची प्रजा सशक्त का होणार नाही? आणि शरीर जर निरोगी आहे तर मन देखील निरोगी (शुध्द) का  होणार नाही? हे देखील त्यांच्या ब्रह्मचर्याचे एक कारण आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: