हाफीज सईदची नवी चिथावणी
PTI ---
Tuesday, March 09, 2010 AT 01:37 AM (IST)
लाहोर, दि. 8 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात वहात येणाऱ्या नद्यांवर भारताने बांधलेल्या धरणांच्या विरोधी, जमात उल् दावाचा प्रमुख हाफीज सईद याने लाहोरमध्ये झालेल्या मेळाव्यात अत्यंत आगलावे भाषण करीत दहशतवादी हल्ल्यांची नव्याने चिथावणी दिली आहे.
पंजाब विधानसभेवर काढलेल्या या मोर्चात हजारो ट्रॅक्टरसह वाहने सहभागी झाली होती. देशाच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी या मेळाव्यात पाणी किंवा युद्ध, काश्मीर स्वतंत्र करा,
शांतता नको, पाणी हवे अशा घोषणा दिल्या. पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांवर भारताने बेकायदेशीरपणे धरणे बांधल्यामुळे, पाकिस्तानातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही, त्यामुळे आता भारताशी युद्ध करण्याशिवाय पर्याय नसल्याची चिथावणीखोर भाषाही सईदने केली आहे.