Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

थापाड्या कासव
ऐक्य समूह
Tuesday, March 09, 2010 AT 01:19 AM (IST)
Tags: bodhkatha

एका कासवाला आकाशातील चंद्र-तारे याबद्दल फार उत्सुकता होती. शिवाय आकाशातून ही पृथ्वी कशी दिसते हेही त्याला पाहायचे होते. शेवटी मनाचा हिय्या करून कासव एका गरुडाकडे गेले व म्हणाले, "गरुडदादा, तू मला आकाशातून जर एकदा फिरवून आणलेस तर मीही तुला पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवीन. गरुडाला कासवाचे म्हणणे पटले व लगेच त्याने कासवाला आपल्या बळकट पंजात घट्ट पकडून आकाशात उड्डाण केले. खूप उंचावरून पृथ्वीचे दर्शन घडविले. कासव अगदी खूष होऊन गेले. त्यानंतर गरुड कासवाच्या मागे लागला. "पृथ्वीच्या पोटातल्या रत्नांच्या खाणी केव्हा दाखवणार? असे कासवाला विचारू लागला पण कासवाने ही रत्नांच्या खाणींची थाप मारली होती. कासव आज उद्या करून टाळाटाळ करू लागले. शेवटी कासवाला अद्दल घडवायची असे मनाशी ठरवून गरुडाने त्याला एक दिवस सरळ उचलले आणि उंचावरून एका मोठ्या खडकावर सोडून दिले. खडकावर आदळल्याने कासव क्षणार्धात गतप्राण झाले. तात्पर्य : खोटे बोलून दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केल्यास फसणारा त्याचा सूड उगवल्याखेरीज राहत नाही.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: