Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इच्छाधारी बाबा "मोक्का'च्या चक्रात
ऐक्य समूह
Monday, March 08, 2010 AT 01:43 AM (IST)
Tags: National4

नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) ः देश-विदेशाशी निगडित सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपावरुन अटकेत असलेल्या राजूरंजन द्विवेदी उर्फ इच्छाधारी बाबा याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे आणि अधिक तपासासाठी पोलीस या भोंदूबाबाला चित्रकूटला घेवून गेले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा बाबा समर्थकांच्या भावनेशी खेळत होता. त्यातूनच त्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली होती. या बाबावर आता मोक्का अंतर्गत कारवाई होत आहे. या कारवाई अन्वये बाबाने जमवलेली अवैध संपत्ती जप्त करता येईल. शिवाय त्याला जामीन मिळवणेही कठीण जाईल.
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या या भोंदूबाबाकडे 600 हून अधिक देशी-विदेशी मुली होत्या. त्याचा काळाधंदा संपूर्ण देशात सुरू होता, असे आढळून आले आहे. पोलिसांनी या सेक्स स्कॅंडलचा सखोल तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. हे सेक्स स्कॅंडल परदेशातही पसरले आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: