Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

लांडगा आणि कुत्रा
ऐक्य समूह
Sunday, March 07, 2010 AT 02:24 AM (IST)
Tags: bodhkatha
एकदा एक लांडगा काही तरी भक्ष्य मिळेल या आशेने एका गावात शिरला. एका घराच्या बागेतच एक मोठा कुत्रा साखळीने बांधलेला त्याला दिसला. लांडग्याला पाहून कुत्रा मोठ्या ऐटीने त्याला म्हणाला, "काय रे हे तुझं जिणं! उपाशीपोटी काही तरी खायला मिळेल का हे पहात वणवण करायची....काही नाही मिळालं, की पुन्हा गुहेत जाऊन निपचिप पडायचं! त्यापेक्षा माझं बघ! मी कसा खाऊन पिऊन धष्टपुष्ट आहे तो...'
त्यावर लांडगा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं आहे. तुझ्या खाण्यापिण्याकडे तुझा मालक वेळच्या वेळी लक्ष देतो तेही ठीक आहे. पण तुझ्या गळ्यात ही साखळीही आहे. हे मी विसरू शकत नाही. तुला मालकाच्या तालावर नाचावं लागतं. माझं तसं नाही. मला एखाद्या दिवशी उपास घडला तरी माझा मी स्वतंत्र आहे!'
तात्पर्य : गुलामगिरीतल्या सुखापेक्षा स्वातंत्र्यातले कष्ट परवडले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: