विद्याप्रेमी अमेरिकन
ऐक्य समूह
Saturday, March 06, 2010 AT 12:52 AM (IST)
अमेरिकन लोक डॉलरचे दास आहेत असे म्हणतात. ते खरे नाही. उलट डॉलर विद्येच्या मागून आपोआप येतात. जे लोक अमेरिकन लोकांना हा दोष लावतात त्यांचा धर्म रोख ना. पण पैसा हाच त्यांचा धर्म आहे किंवा अमेरिकेची वस्तुस्थिती त्यांना माहीत नाही. खरे पाहता "द्राक्षे आंबट आहेत' या कोटीतलाच तो दोष आहे. कॅलिफोर्नियामधील एका बाईने अठरा कोटी रुपये देऊन एक विश्वविद्यालय स्थापन केले आहे. याच प्रमाणे ज्ञानाची बुध्दी अठरा कोटी रुपये देऊन एक विश्वविद्यालय स्थापन केले आहे. याचप्रमाणे ज्ञानाची बुध्दी व प्रसार करण्याकरिता दरवर्षी करोडो रुपये तेथे दान केले जात आहेत. हिंदुस्थानच्या ब्रह्मविद्येची तेथे इतकी मान्यता आहे की, व्यावहारिक वेदांत तेथे जसा आहे तसा आजकाल येथे नाही. परंतु जरी त्या लोकांनी आमच्या वेदांताचे अध्ययन करून तो आपलासा करून टाकला आहे, तरी ते हिंदू झाले नाहीत. त्याचप्रमाणे आपणही त्यांची शास्त्रे व कला पचवून देखील आपले राष्ट्रीयत्व कायम राखू शकू. वृक्ष बाहेरून, आपले खाद्य घेतो परंतु स्वत: ते खाद्य होत नाही. बाहेरील गोडे पाणी, हवा व प्रकाश तो (वृक्ष) खातो व पचवितो. गोडे पाणी किंवा हवा होऊन जात नाही. जपानी लोकांनी अमेरिका व युरोप येथील शास्त्रकला पचविल्या. परंतु स्वत: ते जपानीच राहिले. देवांनी आपल्या कचाला राक्षसाकडे पाठवून त्यांची संजीवनी विद्या शिकून घेतली, पण त्यायोगे ते स्वत: राक्षस बनले नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही युरोप व अमेरिका येथे जाऊन त्यांचे ज्ञान शिकल्याने हिंदुत्वाला मुकता असे नाही. जे लोक ज्ञानाला एखाद्या विवक्षित देशात अडकवू पाहतात आणि म्हणतात की, हे आमचे ज्ञान आहे, ते दुसऱ्यांचे ज्ञान आहे, दुसऱ्यांचे ज्ञान आमच्या येथे येईल तर तो गुन्हा होईल, त्याचप्रमाणे आमचे दुसऱ्यांनी काय म्हणून न्यावे? ते आपल्या ज्ञानाचे शुध्द अज्ञान बनवतात.