Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

ज्ञानप्राप्ती
ऐक्य समूह
Thursday, March 04, 2010 AT 12:26 AM (IST)
Tags: vachnamrut
येशू, महम्मद वगैरे जे महात्मे होऊन गेले, त्यांनी स्वत: लावलेल्या वृक्षांची फळे स्वत:च खाल्ली काय? केव्हाही नाही! या महात्म्यांनी आपल्या शरीराचे खत बनवले होते, मग ते स्वत: फळ कोठून खाणार? आज शेकडो वर्षे लोक ज्या वृक्षांची फळे चाखत आहेत, ते वृक्ष प्राचीन ऋषींच्या रक्षेपासून उत्पन्न झाले आहेत. हा सिध्दांत धर्माचा प्राण आहे, व हाच रशियन भाषा शिकणाऱ्या त्या प्रोफेसराने अंमलात आणला होता.
ज्या वेळी "राम' जपानहून अमेरिकेस चालला होता, त्या वेळी जहाजावर सुमारे दीडशे तरूण होते. त्यांपैकी काही थोर घराण्यातील होते, परंतु त्या सर्वांमध्ये आपल्या घरून रुपये आणलेला असा क्वचितच होता. पुष्कळ तर असे होते की, त्यांनी आगबोटीचे भाडे देखील घरून आणले नव्हते. त्यापैकी काही श्रीमंत उतारूंचे बूट साफ करण्याच्या कामावर राहिले. काही आगबोटीच्या तक्तपोशी धुण्याच्या कामावर होते व काही अशाच हलक्या कामावर नोकर राहून आगबोटीचे भाडे चुकते कर होते. चौकशीअंती असे समजले की,  आपल्या देशाचा पैसा परदेशी जाऊन का खर्च करावा? आगबोटीचे भाडे देखील मेहनत करून चुकते करावे!' असा त्यांचा मानस होता. अमेरिकेत गेल्यावर त्यांपैकी काही विद्यार्थी श्रीमंत लोकांच्या घरी दिवसभर मजुरी करीत असत आणि रात्री रात्रीच्या शाळांमध्ये शिकत असत. काही रेल्वेच्या कामावर, काही खडी फोडण्याच्या कामावर, काही इतर कामावर लागले. हे लोक उन्हाळ्यात मजुरी करीत आणि हिवाळ्यात विद्यालयात शिकत असत.
ज्ञानप्राप्तीसाठी मेणबत्तीप्रमाणे वितळले पाहिजे.
याप्रमाणे सात आठ वर्षे आपला निर्वाह करून आपली डोकी अमेरिकेतील ज्ञान व कला यांनी आणि आपले खिसे अमेरिकेतील पैशांनी भरून हे जपानी लोक स्वदेशी परत येतात.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: