लोकसेवा म्हणजे ईशाराधना
ऐक्य समूह
Tuesday, March 02, 2010 AT 10:28 PM (IST)
"रामा'ने म्हटले आता तर तुम्ही मृत्यूच्या समीप येऊन पोहोचला आहात, आता शिकता कशाला? आता ईश्वराची आराधना करा. त्याने उत्तर दिले "लोकसेवा म्हणजेच ईशाराधना होय! मी ईश्वराला न मानणारा आहे. जनता हाच माझा ईश्वर! तसेच हे कठीण कर्तव्य करीत असता, मी नरकाला गेलो, मला याची पर्वा नाही. माझ्या देशबांधवांचा जर सुखलाभ होईल, तर हजारदा नरकवास मला प्राप्त झाला तरी चालेल. या जन्मात लोकसेवेचा आस्वाद घेण्याचा हक्क बजावत असता मृत्युसंबंधी अज्ञात भीतीला बळी पडून मी ते काम सोडणार नाही!
भूतकाल स्वप्नवत आहे आणि भविष्यकाल नुसते अनुमान आहे. वर्तमानकालच काय तो खरी संपत्ती आहे, असे समजले पाहिजे.
रोख धर्म तो हाच. भगवद्गीतेमध्ये अशी उत्कृष्ट आज्ञा आहे की,
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदा च न.'
कर्म तर करीतच रहा, परंतु फलावर दृष्टी ठेवू नका. लार्ड मेकालेची अशी प्रार्थना होती की, आपण मेला, तर पुस्तकालयात मरावे. "मेलो तर प्रियकराच्या आळीतच मरेन.'
प्रियेच्या गल्लीतच मला पुरावे. फुलबागेमध्येच बुलबुलाची कबर असली पाहिजे. "मेलो तर कर्तव्य बजावत असता मरेन. घनघोर युध्दामध्येच सशस्त्र देह ठेवीन. हिंमत, आनंद आणि उत्साह यांसह प्राण देईन. एक मनुष्य बाग लावत होता. त्याला कोणी विचारले की, "म्हातारेबुवा, तुम्ही हे काय करीत आहा? तुम्ही या याचे फळ खाणार? तुमच्या गोवऱ्या तर स्मशानावर गेल्या सारख्याच आहेत. तुम्हाला त्या फकीराचे वन आठवत नाही काय की,"हे उपदेशक! या जगात माझे घर तयार करून उपयोग काय? जेव्हा मजूर येतात तेव्हा माझे थडगे खोदणारांची मला आठवण होते.