Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्रातल्या 80 लाख शेतकर्‍यांची पीक कर्जे 15 ऑक्टोबरपूर्वी माफ होतील, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात मात्र मृगजळच ठरल्याचे कटू वास्तव समोर आले आहे. राज्यातल्या शेतकरी संघटना, शेतकरी आणि विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी मे-जून महिन्यात केलेल्या राज्यव्यापी उग्र आंदोलनाच्या दबावामुळेच सरकारला पीक कर्जाच्या माफीचा निर्णय घ्यावा लागला.

Wednesday, November 22, 2017 AT 11:31 AM (IST)

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, तरीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर का झाल्या नाहीत असा जाहीर सवाल करत केंद्रीय निवडणूक आयोगावर सुरू झालेली आरोप- प्रत्यारोपांची सरबत्ती करीत सुरू झालेेले राजकारण अखेर या राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपले.

Friday, October 27, 2017 AT 11:32 AM (IST)

अमेरिका म्हणजे जगातला सर्वात सुखी-समृद्ध-श्रीमंत देश अशा समजुतीत या देशाचे गोडवे गाणार्‍यांना, अमेरिकेचे विकृत स्वरूप-अंतरंग लास वेगास शहरात एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करून 58 निरपराध्यांचे मुडदे क्रूरपणे पाडल्याच्या, चारशे जणांना जखमी केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. जगातली आर्थिक आणि लष्करी महासत्ता अशी बिरुदावली मिरवणार्‍या अमेरिकेच्या सामाजिक स्वास्थ्याचे खरे रूप लास वेगास मधल्या घटनेने, जगाला समाजावे, अशी अपेक्षा आहे.

Wednesday, October 04, 2017 AT 11:38 AM (IST)

गेल्यावर्षी राज्यभरात निघालेल्या 57 विराट मराठा क्रांती मोर्च्यांद्वारे मराठ्यांच्या एकजूट आणि वज्रमुठीचे दर्शन सरकार-समाजालाही झाले. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात घडलेल्या मुलीवरच्या अत्याचार-बलात्काराच्या एका घटनेने, असंतोषाची ठिणगी मराठा समाजात पडली आणि बघता बघता राज्यभरात मराठी क्रांती मोर्च्यांचा वणवा पसरला. या मोर्च्यांची सांगता राजधानी मुंबईत लक्षावधींच्या अतिविराट, अतिप्रचंड, मोर्च्याने 9 ऑगस्ट क्रांतिदिनी झाली.

Friday, August 11, 2017 AT 11:38 AM (IST)

भारताच्या बाजारपेठात कधी, केव्हा आणि कोणत्या जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीचा भडका उडेल, हे काही सांगता येत नाही. दोन वर्षांपूर्वी कांद्याचा भाव 80 ते 100 रुपयांवर गेला. गेल्या वर्षी तूर डाळ 200 रुपये किलोवर गेली. कांदा आणि अन्नधान्याच्या भावात वाढ होताच, शहरी भागातल्या जनतेला महागाई प्रचंड भडकल्याचे साक्षात्कार नेहमीच होतात.

Thursday, August 03, 2017 AT 11:20 AM (IST)

1990 मध्ये पंतप्रधानपदावर असताना सत्तेचा गैरवापर करून परदेशात कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती केल्याच्या प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्याने, नवाझ शरीफ यांना तडकाफडकी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Monday, July 31, 2017 AT 11:31 AM (IST)

महाराष्ट्रात राजभाषा असलेल्या मायमराठीची अवहेलना आणि उपेक्षा थांबलेली नाही. इंग्रजीशिवाय आधुनिक जगात तरणोपाय नाही, अशा समजुतीचे भूत बोकांडी बसलेल्या मराठी जनतेलाही मायमराठीच्या अनास्थेबद्दल गंभीर विचार करावा, असे वाटत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या अक्राळविक्राळ आक्रमणामुळे आता ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळाही बंद पडायला लागल्या आहेत.

Saturday, July 29, 2017 AT 11:17 AM (IST)

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि भ्रष्टाचार महर्षी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सत्तेसाठी गळ्यात बांधून घेतलेले लोढणे फेकून देत, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार अवघ्या 14 तासाच्या आत भारतीय जनता पक्षाशी युती करून बिहारचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.

Friday, July 28, 2017 AT 11:29 AM (IST)

दरवर्षीच्या पावसाळ्यात महानगरी मुंबईत जुन्या चाळी आणि बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती कोसळून अनेक निरपराध्यांचे मृत्यू होतात. अशा दुर्घटना घडल्यावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे प्रशासन, संबंधितांवर कडक कारवाईची ग्वाही देते आणि या पुढच्या काळात अशा बेकायदा बांधकामामुळे प्राणहानी होणार नाही, अशी दक्षता घ्यायची घोषणाही करते. काही महिन्यांनी अशा घटना जनतेच्या विस्मरणात जातात.

Thursday, July 27, 2017 AT 11:24 AM (IST)

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताचा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या मूलभूत संशोधन आणि विकासासाठी अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जे. भाभा, डॉ. विक्रम साराभाई या शास्त्रज्ञांनी युवक शास्त्रज्ञांना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्यानेच, भारताने या क्षेत्रात विकसनशील राष्ट्रांच्याबरोबरच उत्तुंग झेप घेतली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ.

Wednesday, July 26, 2017 AT 11:10 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: