Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महादरे तलाव भरला
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : गेली काही दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे कास तलाव पाण्याने भरल्याची घटना ताजी असतानाच सातारा शहरातील ऐतिहासिक महादरे तलाव बुधवारी पहाटे पूर्ण भरल्यामुळे आता व्यंकटपुराचा पाणी प्रश्‍न संपुष्टात येणार आहे.
यवतेश्‍वरच्या पायथ्याला असणारा महादरे तलाव हा ब्रिटिश -कालीन आहे. त्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यवतेश्‍वर येथे पडणारे पावसाचे पाणी वेगळे, ओढ्यामार्गे प्रथम हत्ती तलावामध्ये येते. 
हत्ती तलावामध्ये फिल्टर असल्यामुळे त्या ठिकाणी गढूळ पाण्याचे फिल्ट्रेशन होऊन ते पाणी स्वच्छ होते. स्वच्छ झालेले ते पाणी महादरे तलावामध्ये येते. हे पाणी वेंकटपुरा भागातील नागरिकांना देण्यात येते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: