Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गांधी जयंतीपासून भाजप खासदार पदयात्रेवर!
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी जयंतीपासून सरदार पटेल जयंतीपर्यंत आपापल्या मतदारसंघात पदयात्रा काढण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सर्व खासदारांना दिली.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार भाजपचे सर्व खासदार 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान पदयात्रा करतील, असे त्यांनी सांगितले. लोकसभेसोबतच भाजपचे राज्यसभेतील सदस्यही पदयात्रेवर जाणार आहेत. ज्या मतदारसंघात भाजप कमकुवत आहे अशा मतदारसंघात या खासदारांना पाठवण्यात येईल, असे जोशी म्हणाले.
गावांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने जनजागर करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असून प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात या पदयात्रेद्वारे 150 कि.मी. अंतर कापावे, असेही सांगण्यात आले आहे. या यात्रेसाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात येणार आहेत. ज्यात भाजप आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश असेल. रोजचे लक्ष्य 15 कि.मी. इतके ठेवण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: