Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झुंडबळी विरोधात सातार्‍यात मोर्चा
ऐक्य समूह
Tuesday, July 09, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : मागील पाच वर्षापासून धार्मिक कट्टरतावाद्याकडून वाढत्या प्रमाणात होणार्‍या झुंडबळींना आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात. झुंडबळी व हल्ल्यांची खात्रीने चौकशी करून संबंधितावर कडक शासन करावे, या मागणीसाठी सातार्‍यातील शांतता-प्रेमी नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मागील 5 वर्षापासून धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हुंडाबळीच्या  घटना वाढत्या प्रमाणात होताना दिसत आहे. दलित आदिवासी व अल्पसंख्याक विषयी सातत्याने विद्वेष आणि घृणेचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामधून या समुदायाच्या विरोधातील हिंसाचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. शासकीय पातळीवर असे प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस प्रयत्न केले जात नाहीत, असे निदर्शनास येत आहे.
 घडलेल्या घटनांची चौकशी करून गुन्हेगारांवरावर काटेकोरपणे कारवाई होताना दिसत नाही. या देशात लोकशाही व संविधानाचे राज्य असताना अशा घटना वारंवार घडत आहेत ही गोष्ट अशोभनीय व खेदजनक आहे. भारतीय राज्यघटना, कायदा व सुव्यवस्था, न्याय या सर्वांवरचा विश्‍वास पडावा इतकी परिस्थिती गंभीर झाली आहे.
या सर्व गोष्टींचा निषेधार्थ शहरातील सर्व मानवतावादी, शांतताप्रेमी नागरिक संस्था व संघटनांनी मोर्चा काढला आहे. दलित, आदिवासी व अल्पसंख्याकावर होणारे हल्ले व हुंडाबळीच्या घटनांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, देशातील अल्पसंख्याकांबाबत होणारा भेदभाव आणि हल्ल्यांबाबत परिणामकारक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नव्या विशेष कायद्याचे गठन करावे, शैक्षणिक संस्थांमधील जाती व धर्मभेद यावरून होणारा मानसिक छळ व हिंसाचार याला पायबंद घालण्यासाठी नवा स्वतंत्र कायदा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सत्यशोध, सातारा जिल्हा महिला संघटना, मुक्तीवादी संघटना, समाजवादी प्रबोधिनी, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय छावा संघटना, मुस्लीम ओबीसी संघटना, मुस्लीम जागृती अभियान, श्रमिक मुक्ती दल, संबोधी प्रतिष्ठान, भटके-विमुक्त संघटना, संत रोहिदास सामाजिक संस्था, राष्ट्रसेवा दल, आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: