Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा आरक्षण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
ऐक्य समूह
Saturday, July 06, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) :  मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला एका याचिकादाराने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विशेष सुट्टीकालीन न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला राज्य सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुंबई न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असे नमूद करत हे आव्हान न्यायालयाने फेटाळले व त्याचवेळी आरक्षणाची टक्केवारी 16 ऐवजी कमी करून शिक्षणात 12 व नोकर्‍यांत 13 टक्के करावी, असे निर्देश दिले होते.
 त्यानुसार राज्य सरकारने मराठा आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलेले असतानाच आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिकादार वकील संजीत शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाचे
दार ठोठावले आहे. आरक्षणाचा अधिकार सरकारला नव्हे तर राष्ट्रपतींना आहे तसेच 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण घटनाबाह्य असल्याने ते तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी विनंती शुक्ला यांनी याचिकेत केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: