Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधींचा धाडसी निर्णय : प्रियांका वाड्रा
ऐक्य समूह
Friday, July 05, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी अखेर मौन सोडले आहे. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल यांनी धाडसी निर्णय घेतले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन धाडस दाखवले आहे. काही लोकांमध्येच, असे धाडस दाखवण्याची क्षमता असते. मी त्यांच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते.
लोकसभा निवडणुकीतील पक्षाचा आणि अमेठीतून स्वत:च्या झालेल्या पराभवामुळे राहुल गांधी व्यथित होते. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र, त्याला ते बधले नाहीत. त्यामुळे प्रियांका वाड्रा यांनी प्रथमच राहुल यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: