Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण जाधव प्रकरणी 17 जुलैला निर्णय
ऐक्य समूह
Friday, July 05, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित खटल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या 17 जुलै रोजी निर्णय देणार आहे. जाधव सध्या पाकिस्तानच्या कैदेत असून त्यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस (आयसीजे) द्वारे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात जाधव खटल्या प्रकरणी 17 जुलै रोजी निर्णय देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायमूर्ती अब्दुलकवी अहमद युसूफ या प्रकरणी अंतिम सुनावणी देणार आहेत. जाधव यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाचा ठपका ठेवत एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांना पाकिस्तानने कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस (दूतावासाशी संपर्क) करू न दिल्याचा आरोप करत भारताने पाकिस्तानविरोधात मे 2017 मध्ये आयसीजेमध्ये धाव घेतली. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाच्या निर्णयालादेखील भारताने आव्हान दिले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: