Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘ईव्हीएम’वर चर्चा पुरे : अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा
vasudeo kulkarni
Tuesday, June 11, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करत असतानाच, दुसरीकडे त्यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, यांनी ईव्हीएमला दोष देत न बसता विधानसभेच्या कामाला लागण्याचा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विसाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लोकसभेची चर्चा आता बस्स करा,  
असा सल्ला सर्वांना दिला. निकाल कसा लागला, कुणी लावला, यावर चर्चा नको. येत्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल यासाठी कामाला लागा. ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन अजितदादांनी केले.
विलीनीकरण नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व असून ते स्वतंत्रच राहणार आहे. आपला पक्ष कुठेही आणि कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही. त्या उठलेल्या वावड्या होत्या, असे सांगतानाच जातीयवादी पक्षांना थांबवण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आघाडी पुन्हा राज्यात सत्तेत कशी येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. बेरोजगारी वाढली आहे, कंपन्या बंद होत आहेत, युवकांना नोकरीसाठी वणवण करावी लागत आहे, कुठलाही घटक समाधानी नाही, अनेक जागा रिक्त आहेत. जेवढ्या जागा रिक्त आहेत, त्या सर्व ठरावीक काळात भरल्या जातील, असे आश्‍वासन देतानाच लोकांचा विश्‍वास मिळवण्याचे कामही आपल्याला करायचे आहे, असे पवार म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: