Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा पोलीस दलातील 11 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : जिल्हा पोलीस दलातील 11 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली असून याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी जाहीर केले आहेत.
राज्य शासन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्या पोलीस दलातील 500 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचे काम राज्य पोलीस मुख्यालयात सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी त्याबाबतचे आदेश जाहीर करण्यात आले. यानुसार सातारा पोलीस दलातील महेंद्रसिंह निंबाळकर, पुष्पा किर्दत, किरण शाळीग्राम यांना मुंबई शहर येथे, शिरीषकुमार दिघावकर यांची पुणे सीआयडी, ज्योतीराम पाटील यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, श्रीकृष्ण पोरे यांना सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्र, वैशाली पाटील यांना गोंदिया, सुरेश घाडगे यांना सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाळू भरणे यांना गडचिरोली, मारुती खेडकर यांना परभणी, प्रवीण पाटील यांना सोलापूर शहर येथे पदोन्नती देण्यात आली.आहे. कार्यरत असणार्‍या ठिकाणाहून कार्यमुक्त होवून तत्काळ पदोन्नती दिलेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: