Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण तालुक्यात बनावट दारू निर्मिती कारखान्यांवर छापा
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
5सातारा, दि. 7  : सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा घालून फोर्ड आयकॉन कंपनीच्या एक चारचाकी वाहनासह एकूण 2 लाख 4 हजार 178 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमध्ये 4 जणांना अटक करण्यात आली असून रज्जाक हिराबाई सय्यद, रा. मलवडी, ता. फलटण हा फरार असून एकूण 5 जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक स्नेहलता श्रीकर राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीमध्ये आसीफ रज्जाक सय्यद, रा. मलवडी, ता. फलटण याच्या ताब्यातून बनावट दारु निर्मिती करिता लागणारे स्पिरीट, रिकाम्या देशी दारु सखू  ेन्स, बुचे सील करण्यासाठी वापरण्यात येणारे एक हातमशीन, बनावट 180 मि.ली. व 90 मि.ली. क्षमेच्या देशी दारु सखू संत्रा व बनावट विदेशी दारु मॅकडॉल नं. 1 व्हीस्की दारुचा साठा व फोर्ड आयकॉन कंपीनीचे एक चारचाकी वाहन. मौजे वाखरी, ता. फलटण येथून संशयित आरोपी बाबा मारुती जाधव याच्या ताब्यातून बनावट देशी दारु सखू संत्राचा रुपये 3 हजार 640 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विकास ईश्‍वर काकडे, रा. बिबी, ता. फलटण याच्या ताब्यातून बनावट देशी दारू सखू संत्राचा रुपये 1 हजार 352 किमतीचा तर राहुल श्रीकांत सरगर, रा. पवार गल्ली, महतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण याच्या ताब्यातून विदेशी दारुचा रुपये 4 हजार 170 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय शिलेवंत, एस. व्ही. खराडे, बी. व्ही. ढवळे. नितीन शिंदे, महेश गायकवाड, सचिन खाडे, महेश मोहिते, राजेंद्र आवघडे, अजित रसाळ, अरुण जाधव, सागर साबळे यांनी भाग घेतला. पुढील तपास प्र. निरीक्षक संजय शिलेवंत हे करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: