Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अन्न व औषध प्रशासनाची वाई येथील हळद व्यापार्‍यांवर कारवाई
ऐक्य समूह
Friday, June 07, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
5सातारा,  दि. 6 : अन्न व औषध प्रशासनाकडून  वाई तालुक्यातील दीपचंद प्रतापचंद जैन मालक मे. डायमंड कंपनी, शाहबाग फाटा, वाई  यांच्याकडे अचानक तपासणी केली असता नियम मोडून  हळद  पावडर विकत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
या व्यापार्‍याकडून  छापलेल्या बॅगवर उत्पादनाचा दिनांक, बॅच नंबर तसेच उत्पादकाचा पत्ता नसल्याचे आढळून आले. या लेबलवर  सेलम, सांगली असे  उल्लेखित करून सदर हळद पावडर ही सांगली येथील असल्याचे भासविले जात असल्याचे आढळून आल्यामुळे 16 लाख 99 हजार 600 रुपये किमतीचा 16 हजार 996 किलोचा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी तपासणीवेळी हळद पावडरच्या गुणवत्तेबाबत कोणतेही विश्‍लेषण केलेले नाही.
संदीप सुरेशराव कोरडे मालक यांच्या मे. कोहिनूर स्टॉल, शाहबाग  फाटा, वाई येथे तपासणी केली असता हळद पावडरच्या लेबलवर चुकीचा नोंदणी क्रमांक नमूद केला आहे तसेच मिरची पावडर व कांदा लसूण मसाला या अन्न पदार्थांच्या पॅकेटवर लेबल नसल्याचे आढळून आले असून 382  किलो,  रुपये 59 हजार 460 किमतीचा साठा जप्त केला आहे.   येथील इतर  10 अन्न व्यावसायकांची तपासणी करून अन्न व सुरक्षा व मानके कायद्यातील नियमावलीचे पालन करून अन्न पदार्थांची विक्री करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.  सदर कारवाई शिवकुमार कोडगिरे, सहायक आयुक्त (अन्न), सातारा यांच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, युवराज ढेंबरे, विकास सोनवणे, नमुना सहाय्यक सुनील सर्वगोड यांनी व सुरेश देशमुख, सहआयुक्त,पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: