Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वेळे येथे कंटेनरची टेम्पो, दुचाकीला धडक
ऐक्य समूह
Friday, June 07, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: re1
महिला ठार, पाच जण गंभीर जखमी
5भुईंज, दि.6 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी झालेल्या थरारक अपघातात एक महिला ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. अपघातानंतर इतर वाहनचालकांची कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात येऊन एक तासानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे जाणार्‍या कंटनेरने (एमएच-46-एआर-3209) वेळे गावानजीक सातारा बाजूकडे जात असलेल्या टेम्पोला  (नंबर मिळू शकला नाही)  पाठीमागून जोरदार धडक दिल्याने टेम्पोमध्ये बसलेल्या राणी अशोक लंगोटे (वय 30, रा. तळदंगी, ता. हातकणंगले) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश रघुनाथ मोरे (वय 35, रा. कोल्हापूर), विकास धुमाळ (वय 38, रा. सोनके, ता. कोरेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच कंटेनरने पुढे सोळशी फाट्यावर दुचाकीला (एमएच-11-एआय-1645) ठोकरल्याने दुचाकीवरील भानुदास मानसिंग देशमुख, पत्नी मनीषा व मुलगा, असे तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पोलीस पाटील तनुजा पवार, भुईंजचे हवालदार घाडगे, आनंदा भोसले हे घटनास्थळी फौजफाटा घेऊन हजर झाले होते. सपोनि. श्याम बुवा व दुर्गानाथ साळी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: