Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऋतिक सोनावलेचा मृतदेह सापडला
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: re2
5वाई, दि. 5 : पाय घसरून कालव्यातून वाहून गेलेला ऋतिक विनायक सोनावले (वय 19, रा. चिखली, ता. वाई) या युवकाचा मृतदेह रात्री 10.30 च्या सुमारास कालव्यामध्ये सापडला.
ऋतिक चिखली येथील मित्रांसमवेत व्याहळी कॉलनी येथील ओढ्यामध्ये वाकळा धुण्यासाठी टमटम करून आला होता. त्याच्या सोबत 8 ते 10 मित्र होते. वाकळा धुवून झाल्यानंतर ऋतिक कालव्याशेजारी उभा होता. अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागल्याचे पाहताच इतर मुलांनी पाण्यात उड्या घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. अखेर तो पाण्यात दिसेनासा झाला. याबाबतची फिर्याद वाई पोलिसात दाखल झाली होती. रात्री 10.30 च्या सुमारास त्याचा मृतदेह कालव्यामध्ये आढळून आला. हवालदार शेलार तपास करीत आहेत.
दरम्यान दुसर्‍या एका घटनेत विकास रामचंद्र पाटील (वय 22, मूळ रा. कोलवड, ता. यावल, जि. जळगाव) हा आपल्या तीन मित्रांसमवेत वाईला फिरण्यासाठी आला होता. सकाळी 8 च्या सुमारास ते आंघोळ करण्यासाठी पेटकर वस्ती येथे धोम डाव्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र त्याला पोहता येत नव्हते. पाण्याचा देखील अंदाज न आल्याने तो कालव्यामध्ये बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा मृतदेह रात्री 11 च्या सुमारास सापडला. याबाबत वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: