Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाढे फाट्याजवळ अपघातात दोघे गंभीर
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 : मंगळवारी मध्यरात्री येथील वाढे फाट्याजवळ ट्रकला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शंकर कारंडे, रा. इस्लामपूर, बालाजी बालोसे, रा. औसा (कर्नाटक) हे दोघे पुण्याकडे दुधाचा टँकर घेऊन जात असताना वाढे फाट्याजवळ टँकर पंक्चर झाल्याने त्यांनी तो महामार्ग कडेला लावला. मंगळवारी मध्यरात्री पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने ट्रकला जोराची धडक दिल्याने त्यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: