Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजलक्ष्मी टॉकीज जवळ दोन गटात राडा
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 5 : येथील राजलक्ष्मी टॉकीज जवळ आज सायंकाळी मुस्लीम समाजाच्या दोन गटांमध्ये राडा होऊन त्यामध्ये एक जण जखमी झाला. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बुधवारी सायंकाळी 5. 30 वाजण्याच्या सुमारास येथील राजलक्ष्मी टॉकीजच्या जवळ 5  युवकांच्या दोन गटात वादावादी सुरू झाली असताना वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी सोमनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तो वाद सोडवून दोन्ही गटांना तेथून हुसकावून लावले. तेथून ते पोवई नाक्याकडे गेले असता हे दोन्ही गट दांडकी घेऊन पुन्हा राजलक्ष्मी टॉकीजच्या जवळ दाखल झाले. त्यांच्यात पुन्हा वादावादी होऊन एकावर दांडक्याने हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी सोमनाथ शिंदे आपल्या सहकार्‍यांसमवेत पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढाकार घेऊन वाद सोडवून चौघांना सातारा शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले. जखमी झालेला युवक निघून गेल्याने तो हाती लागला नाही. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: