Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूज येथील खून प्रकरणातील संशयितास अटक व कोठडी
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:33 AM (IST)
Tags: re3
5वडूज, दि. 24 : पाच महिन्यांपूर्वी वडूज येथे झालेल्या निर्घृण खून प्रकरणातील संशयित नाज्या राजेखान भोसले (वय 19) याला वडूज पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबतची अधिक माहिती अशी, की येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड बज्या उर्फ बजरंग गदाप्पा पुजारी (वय 43) याचा दि. 17 डिसेंबर 2018 रोजी दिंडी भोसले, नाज्या भोसले व गौरी भोसले यांनी काठी, खुर्चीने मारहाण करून खून केला होता. यातील तीन संशयितांपैकी एका महिलेस यापूर्वीच अटक करण्यात आली आहे तर गौरी भोसले व नाज्या राजेखान भोसले हे संशयित फरार होते. मात्र, पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीच्या आधारे नाज्या भोसले याला वडूज पोलिसांनी रेवलकरवाडी, ता. खटाव येथील मंदिरातून रात्री उशिरा नाट्यमयरीत्या अटक केली. त्याला वडूज न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: